अनेक मध्यमवर्गीय कुटुंब राहात असलेल्या अनेक मजली इमारतींची एक सोसायटी. त्यातील अनेक लहानशा ब्लॉकमधील एका ब्लॉकमध्ये आम्ही राहतो. पण असे दिसते की आमच्या सोसायटीमध्ये अगदी आवडीने राहणारे प्राणी - जे माणसांपेक्षा संख्येने कदाचित जास्तच असतील - मांजरी आणि बोके आहेत. नखे आत-बाहेर करण्याची क्षमता असलेल्या या चतुष्पादांना आमची कसलीच भीती नसल्याचे जाणवते - बहुधा त्या सिंह, वाघ, जंगली लिंक्स आणि चित्ते इत्यादींची मावशी असल्यामुळे असे असू शकेल. एका इंग्रजी म्हणीप्रमाणे यांना नऊ जन्मांचे आयुष्य एकाच वेळी लाभलेले असते म्हणे. त्यामुळेच त्या सर्वांना त्रास देतात, तरीही काही जणांना त्यांची मजा वाटते. आमच्या गल्लीतील या मांजरींची आपापली राज्ये आहेत. तळमजला, पहिला आणि दुसरा मजला इथपर्यंत राज्याची सीमा असलेल्या मूषकहर्त्या फक्त फार भूक लागलेली असेल तरच लाइन ऑफ कंट्रोल पार करून इतर मजल्यांच्या स्वयंपाकघरांत दरोडा घालतात. गच्ची तर फक्त युवराज-युवराज्ञींसाठी राखून ठेवलेली जागा आहे, नाही म्हणायला जुन्या काळच्या संस्थानी मांजरी काही वेळा तिथे उन्हात डुलक्या घेण्यासाठी आणि स्वतःला चाटून साफ करण्यासाठी कधी-कधी जातात. काही बोक्यांनी आपल्या सोयीच्या अशा जागा शोधून ठेवल्या आहेत जिथे कदाचित उंदरांनासुद्धा जागा कमी पडत असेल, जसे वॉचमनचे केबिन, जिथे तो स्वतःसुद्धा मांजर-डुलकी काढत असावा. देवाच्या कृपेने आणि मायभवानीच्या आशीर्वादाने या सर्व मांजरींना प्रत्येकी दोन स्वरयंत्रे मिळाली आहेत - एक गुरगुरण्यासाठी आणि दुसरे म्यांव करण्यासाठी - म्हणून स्वतःला स्वरकोकिला समजणाऱ्या काही मांजरी विशेष प्रसंगी रात्रीच्या वेळी "सूरसाधेना" करून सर्वांचे जागरण घडवतात. स्वच्छतेचा आव आणणारे काही मांजरद्वेष्टे लोक आमच्यात आहेत ज्यांना या मांजरींनी केलेली घाण काही केल्या बघवत नाही. काहींना असेही वाटते की या मांजरींना हाकलून लावले पाहिजे. पण बहुतांश लोक शांतिप्रिय आहेत त्यामुळे ते त्रयस्थपणे बघत आहेत की मांजरींचे भवितव्य आहे तरी काय. पण मोठा प्रश्न हा आहे की मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण! | Entry #33082 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
24 | 6 x4 | 0 | 0 |
|
आम्ही एका बहुमजली बिल्डिंग कॉम्प्लेक्समधील एका लहानश्या घरात राहतो. येथे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात. पण येथील पाळीव मांजरींची संख्या ही जनसामान्यांपेक्षाही जास्त आहे. ही वाघाची मावशी तिचे धारदार पंजे दाखवीत वाघ, सिंह, लिंक्स किंवा ओसीलॉट सारख्या इतर रानमांजरींची आठवण ठेवत तिच्या आजूबाजूच्या कोणालाही घाबरत नाही. वाढत्या मांजरीची संख्या सर्वांना त्रासदायक असली तरी काही जणांसाठी करमणूकही आहे. आमच्या परिसरात राहणाऱ्या या मांजरींचे त्यांच्या जागेबद्दल स्वतःचे अगदी कठोर सीमांकन आहे. तळमजला, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील मांजरी त्यांचे मजले अजिबात सोडत नाहीत पण क्वचित अगदी भुकेने कळवळून ही नियंत्रण रेषा ओलांडून स्वयंपाकघरांकडे धाव घेऊ शकतात. टेरेस केवळ लहान पिलांसाठी राखीव आहे पण कधीकधी मोठ्या मांजरी त्यांचे अंग चाटण्यासाठी आणि उन्हात पडून आराम करण्यासाठी तिथे येतात. काही बोके अशा कोपऱ्यात झोपतात जिथे त्यांना आराम करता येईल आणि मांजरीला फारशी लोंबकळत बसण्यासाठी जागा नसते, जसे की वॉचमनची केबिन, तिथे त्यांना तसेच एखादे गरीब बिचारे वॉचमन पण झोपी गेलेले दिसू शकतात. देवाने या मांजरींना दोन आवाजांची देणगी दिलेली आहे एक दुसऱ्यावर खेकसून आरेरावी दाखवण्यासाठी तर दुसरा गोंडस म्यांव चा आवाज. आमच्या परिसरातील काही मांजरी तर काही विशेष निमित्त काढून सर्व रहिवाशांना रात्रभर त्यांच्या कर्कश रडण्याने जागतही ठेवतात. स्वच्छतेची आवड असणारे काही रहिवासी मात्र या मांजरी घाण आणि गोंधळ करतात त्यामुळे हैराण होतात. काही त्रस्त रहिवाशांना ठामपणे असेही वाटते की या मांजरींना हाकलले पाहिजे. पण ते बिचारे या मांजरींना कोणत्या मार्गाने बाहेर काढता येईल या प्रतीक्षेत आहेत. असो, आता मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधू शकेल हे काही आम्हाला माहित नाही. | Entry #32701 — Discuss 0 — Variant: Marathimaramar
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
9 | 1 x4 | 2 x2 | 1 x1 |
|
मध्यम वर्गीय लोकांसाठी आसरा असणाऱ्या बहुमजली इमारती मध्ये एका छोट्या सदनिकेत आम्ही रहातो. परंतु मार्जर्वर्गीय सभासदांना आमच्या इमारती बद्दल अचानक जे आकर्षण वाटू लागलं आहे, ते आम्हा होमो सेपियंस (मनुष्य वर्गीय) पेक्षा सुद्धा जास्त असेल. कारण, मागे घेता येण्याजोगे असलेल्या नख्या युक्त हे चतुष्पाद, जे त्यांच्या जातीतील इतर सभासदांप्रमाणे म्हणजेच सिंह, वाघ, लिंक्स (कॅनडा मध्ये सापडणारा मांजर वर्गीय प्राणी) आणि ऑसीलॉट्स (दक्षिण व मध्य अमेरिकेत सापडणारा मांजर वर्गीय प्राणी) प्रमाणे बढाया मारतात आणि आजूबाजूच्या कोणालाही घाबरत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीतही जगणाऱ्या ह्या मांजरांच्या वाढत्या संख्येचा अनेकांना त्रास होतो परंतु अनेकांसाठी हेच आनंददायक असतं. आमच्या परिसरातील ह्या मांजरांचे त्यांच्या स्वतःच्या अशा खास सीमा असलेले प्रदेश आहेत. भुकेमुळे स्वयंपाकघरात पडणाऱ्या धाडे व्यतिरिक्त, उंदीर पकडण्यात तरबेज असणारी मांजरं तळ मजला, पहिला मजला आणि दुसरा मजला इथे आपला कब्जा करतात. गच्ची हि खास करून तरुण मांजरांसाठी आणि क्वचित कधीतरी पूर्वीच्या खानदानी सियाम (मांजराची जात) साठी अंग चाटायला आणि उन्हात अंग शेकून घेण्यासाठी वापरली जाते. काही बोके त्यांच्या सुखावह झोपेसाठी उबदार कोपरे शोधून काढतात; अशा जागा जिथे दुसरं मांजर जाऊ सुद्धा शकत नाही, उदाहरणार्थ चौकीदाराची केबिन, जिथे त्यांनी बिचाऱ्याला डुलकी घेताना पाहिलेला असतं. देवाने मांजरांना दोन प्रकारच्या आवाजाची देणगी दिली आहे, एक आवाज म्हणजे गुरगुरण्याचा आणि दुसरा म्हणजे मिआऊ चा आणि तार सप्तकात गाणारी मांजरं आमच्या भागातील समस्तं रहिवाश्यांना खास प्रसंगी त्यांच्या निशाचर वाद्यवृन्दाने जागं ठेवतात. जेव्हा हि राखाडी मांजरं वस्तूंची नासधूस करतात किंवा पसारा घालतात तेंव्हा काही स्वच्छताप्रिय रहिवासींना त्रास होतो. रहिवाश्यांपैकी एखाद्या भांडखोर, क्रूर व्यक्तीला खूप वाटत असतं कि त्या मांजरांना चाबूक दाखवून बाहेर काढावं. यासागळ्यात, कबुतरं मांजर कोणत्या बाजूला उडी मारतंय याची वाट बघत असतात. असो, शेवटी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न आहेच! | Entry #32866 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
6 | 0 | 2 x2 | 2 x1 |
|
आम्ही अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना आश्रय देणाऱ्या बहुमजली इमारत संकुलाच्या एका लहानश्या खोलीमध्ये राहतो. परंतु, फेलिस डोमेस्टीका कुटुंबातील ज्या सदस्यांनी आमच्या संकुलात सदनिका घेतली आहे ते कदाचित होमो सेपियन्स अथवा मनुष्य सदस्यांपेक्षा खूपच जास्त असतील. कारण, हे चार मागे घेता येण्याजोगे पंजे आहेत की, जे त्यांचा स्वाभिमान बाळगू शकतात- सिंह, वाघ, लिंक्स् आणि ओसेलॉट्स हे आमच्या परिसरात कोणालाही न घाबरता देशातील चुलत भावंडांचा अभिमान बाळगतात. नऊवेळा आयुष्य असलेल्या वाढीव संख्येच्या मांजरांचे त्रासदायक तीक्ष्ण पंजे बघून बऱ्याचजणांना गंम्मत वाटते. आमच्या प्रशस्थ रस्त्यातील या मांजरींचे प्रदेशाबद्दल स्वतःचे कठोर सीमांकन आहे. स्वयंपाकघराच्या नियंत्रणरेषेबाहेर भुकेलेले उंदीर वगळता अन्य उंदीर ठेवतात. गच्ची फक्त लहान पिल्लांसाठी राखीव आहे तर,तीच गच्ची कधीकधी पूर्वीच्या सियाममधील खानदानी शरीर चाटण्यासाठी आणि सनबाथसाठी वापरतात. पहारेकरी कक्षासारख्या ठिकाणी त्यांना गरीब सहकारी डुलकी घेताना आढळतात, जिथे मांजरीला झोके घेण्यासाठी जागा नसते आणि अश्या ठिकाणी काही बोक्यांना झोपायला आरामदायक कोपरे सापडतात. देवाने या मांजरींना दोन ध्वनीयंत्रे दिली आहेत. एक गुरगुरण्यासाठी आणि दुसरेम्याव-म्याव असा आवाज काढण्यासाठी. आमच्या परिसरातील काही सोप्रानो मांजरी खास प्रसंगी सर्व रहिवाशांना त्यांच्या निशाचर वाद्यवृंदांनी जागृत ठेवतात. जेव्हा या राखाडी मांजरी त्यांच्या गोष्टींमध्ये गडबड करतात, तेंव्हा, पॅटनमध्ये मांजर म्हणून स्वच्छ राहण्याची इच्छा असलेल्या काही रहिवाश्यांची चिडचिड होते. रहिवाशांमधील फेरीवाल्यांना ठामपणे असे वाटते की, या मांजरींना मांजरीच्या 'ओ' शेपटीने हाकलले जायला हवे. बरं! आम्हाला ठाऊक नाही की, मांजरीला घंटा बांधण्यासाठी कोणाला बरे बोलावले जाईल! | Entry #32672 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
0 | 0 | 0 | 0 |
|